STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

दिपावली

दिपावली

1 min
364

थंडीचा सुखद वारा  

अभ्यंग स्नानाचा प्रेमाचा मारा  


घराघरात पहाटे उटणं, तेल, सुगंधी साबणाचा वास 

प्रेमाची लाडीक जवळीक वाढवतो खास  


सप्तरंगाच्या रांगोळीवर इवल्याशा पणतीचा प्रकाश  

तोर्‍यात उभा दारावर आकाशकंदील झकास  


वाजतगाजत आली वसुबारस  

पुजा वासरु गाय  

बछड्यासाठी दुधदुभती राहो ही माय  


सनईच्या सुरात आली धनतेरस  

दिव्याची रोषणाई, घरात सुंदर आरास 

 

पुष्पवर्षावाने दरवर्षी लक्ष्मीपुजनाचा थाट  

लाडू, करंजी, अनारसे सजवायचे देवाजवळ ताट  


कानात होते कुजबुज अहो उद्या आहे पाडवा 

सौच्या उत्साहाला सागर भरती 

पतीदेव भेट देऊन करवुन घेतात आरती  


भाऊबीज आली घेऊन माहेरची हुरहुर  

वाट दिसते सासरच्या दारातुन 

आगळावेगळा दिपावली सण 

ओथंबुन वाहत राहते टवटवीत मन


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ