STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

दिनधर्म

दिनधर्म

1 min
195

पहिला प्रहर उगवतोस, अलगद सगळ्यांना जागवतोस.

कोणासाठी लहान तर, कोणासाठी मोठा बनतोस.


कोणाच्या चेहऱ्यावर, सुखाचा सडा मारतोस.

कोणाच्या झोळीत, दुःखाचा पाऊस पडतोस.



कोण्या उगवत्याला, जन्म देतोस.

सरत्या शेवट्याचा, म्रुत्यु होतोस.



संपणार तर तू आहेस, काही मोजक्या वेळेत.

पुन्हा तसाच येनार आहेस, अंधारी काळोख चिरत.



कालचक्राचा सेवक तू, नित्य तूझे कर्म.

किंमत तुझी ओळखली, समजला तेव्हा दिनधर्म.


Rate this content
Log in