STORYMIRROR

Varsha Kendre

Others

3  

Varsha Kendre

Others

दिन आज कवितेचा

दिन आज कवितेचा

1 min
149

 सोनियाचा दिन आज

 कवितेच्या सन्मानाचा

 सरस्वती पूजनाचा

 कवी मुजरा मानाचा


 श्रेष्ठ साहित्य लिहिले

 संत महात्म्यांनी किती

 काव्यसंग्रहाचा ठेवा

 जपु मानवता नाती


 संस्कृतीच्या रक्षणार्थ

 ज्येष्ठ कवी झगडले

 रूढी-परंपरा दूर,

 करण्यास पुढे आले


 रक्षण्यास स्त्री- वैभव

 लेखणीस धार दिली

 अत्याचार थांबण्यास

 दिनरात एक केली


 करू वंदन त्रिवार

 नित कविवऱ्यासाठी

 जावो कवी तेथे जेथे

 जागा नसे रवीसाठी


Rate this content
Log in