STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

दीपस्तंभ

दीपस्तंभ

1 min
217

भाग्यवान मी जीवनी

जाहली कृपा परमेश्वराची

लाभली साथ सदैव

मार्गदर्शन करणाऱ्यांची


प्रेरणा दिली मला

आजवर भेटले ज्यांनी

घेऊन बोध अनुचित

चालतेय त्याच मार्गांनी


आभारी मी योगीताची

जिने दाखविला मार्ग

कविता लिहिण्याचा मला

व्यक्त होऊन मिळते सुख स्वर्ग


केलेय सहाय्य मला

जेव्हा जेव्हा अडले

आलाय जोम तेव्हा तेव्हा

लिहिणे नाही थांबवले


स्पर्धात्मक युगात हया

खेचतात सर्वेच पाय

बघतात आपलाच फायदा

निस्वार्थी माणसे देवाहून कमी काय


निरपेक्ष,परोपकारी 

गूण हे शुध्द रक्ताचे

घडवतात हेच समाज

प्रेरणा ठरतात आमच्यासारख्याचे


Rate this content
Log in