STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

दीपोत्सव

दीपोत्सव

1 min
344

दिव्यप्रकाशाच्या झोतात

हासत, नाचत आली दिवाळी

घरदार स्वच्छ करूनी सारे

दारी घालते ठिपक्यांची रांगोळी....


पवित्र पणती लावली दारी

मिणमिणती आहे छोटी जरी

लख्ख प्रकाश देते सर्व ठिकाणी

तिमिरातुनी तेजाकडे नेते खरी...,


दिवाळीला झाली सुरूवात आता

आनंदमयी वातावरण सगळीकडे

प्रातःकाली उठूनी दीप लाविले

दीपमाला खुलते बर चोहिकडे....,


गरीबाघरी नेवू ज्ञानमयी दिव्यप्रकाश

ज्ञानज्योतीने दिवा लावू ज्ञानाचा

पणती पणती पेटवू अंगणी त्यांच्या

प्रकाशमान करूया सण दिवाळीचा..


आप्तजनांना आपण भेटी देवूनी

निभवू जन्मांतरीची ही गोड नाती

सौख्याचे ,मांगल्याचे दीप लावूया

सगे,सोयरे आपले आनंदात राहती....


Rate this content
Log in