दीपक
दीपक
1 min
197
चार एकत्र होती भावंडे
स्वभाव मात्र त्यांचे वेगवेगळे
जरा काही खुट्ट काही होताच
यायचे जसे सारे हे डोमकावळे..
वडिलांमुळे बाई हौती पुण्याई
अमाप होती धन अन संपत्ती
पार चालली भावांमुळे धुळिला
यायला लागली हो मग आपत्ती...
मुलांच्या भांडणाला उधाण आले
जे जे आहे ते मलाच बर हवे
सततचे वाद नाही शांतता बरं
त्यांच्यातील वाढत चालले हेवेदावे..
एक कथा सांगितली वडिलांनी
या एकीचे कसे असते बळ
यातूनच मग मार्ग काढायचा
नाही काढायचा मुळीच पळ.....
वडिलांनी देवासमोर दीपक पेटवला
चोहिकडे लख्ख प्रकाश पडला
मुलांना एकीची ताकद समजली
वडिलांनी सांगितलेला विचार पटला.....
