Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

4  

Chandan Pawar

Others

दीपावली..

दीपावली..

1 min
170


सणांचा राजा दिपावली म्हणजे

सुख-समृद्धीचा विधायक उत्कर्ष...

आप्तेष्ट, स्नेहींच्या भेटीगाठीने

सकलांच्या तनी- मनी हर्ष...


सडा-रांगोळी, आकाशकंदिलाच्या

प्रकाशाने पडे अंगणी सावली..

फराळ-फटाके, वस्त्र- आभूषणे

खरेदीचे द्वार उघडे दीपावली..


प्रसन्नता-शांतता- उदारतेने

जपू या " वसुबारस" चा ठेवा..

"आरोग्यम धनसंपदा" च्या जाणिवेने

लावू "धनत्रयोदशी" चा दिवा..


"नरकचतुर्दशी"ला सुप्रवृत्तीचे

अभ्यंगस्नान लावूनी सुवासिक उटणे..

"लक्ष्मी-कुबेर" पूजनाने जीवनी

झळकावे मानवतेचे चांदणे..


लोककल्याणकारी सतप्रेरणेने

"बलिप्रतिपदा" अवतरते भूवरी..

" भाऊबीजेच्या" साक्षीने होई

प्रेम-स्नेहाची दिपावली साजरी..


कोरोनाचे चक्रव्यूह भेदून करू

"फटाकेमुक्त" दीपोस्तवाची इच्छा..

आपणां सर्वांना दीपावलीच्या

लक्ष लक्ष तेजोमय सदिच्छा...


Rate this content
Log in