STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Others

3  

Jyoti Nagpurkar

Others

दीपावली

दीपावली

1 min
316

चंद्र जातो रजेवरती

काळोख आम्हांस घेरत

लुकलुकवत दिव्यांची झग

फाकवत उजेड अंगणात


अनोखी रात्र अमावस्येची

अंधार कवटाळी बाहुत

दिपक ज्योती उजळती

आशा भावना उमलत


आदानप्रदान बाणत अंगी

एकमेकांशी संवाद साधती

नवनविन नाती संजोळुन

सकारात्मकतेची जाग होती 


उल्हास मनात भरवून

नटली ही धरामायी 

अद्भुत हा संगमयोग

अवतरते सुखशांतामायी


रांगोळी आकारते अंगणी

सजते तोरण दारावर

सुवास दरवळतो फूलगोंद्याचा

प्रजल्वित दीप उंबरठ्यावर


नथ डोलती नाकात

सुस्वर भरते ओठांवर

गजरा माळते केसांत

मोर नाचतो पदरावर


लुभवती दीपावलीची ज्योत 

हर्षित मनाची व्यथा

आकाशदिप डोलतो रूबावात

सांगतो, आपली गाथा


पंचपक्वानांची भरली थाळी

जिभेवर भरली लाळ  

सुवासिनीं नटल्या हौशीनं

पाहुण्यांची होईल वर्दळ


पतीची उडतेय तारांबळ

गुंततोय जीव रूपराणीवर

म्हणतो कसा, अर्धांगिनीस

तूच गृहलक्ष्मी धरोवर ....


Rate this content
Log in