दिड पंख
दिड पंख
1 min
196
भल्या मोठ्या वृक्षावरती
पाखरे चिवचिवती
इवली इवली पिल्लं
घरट्यामधी विसावती
भरवितांना चोची दाणा
माय -बापा आनंद भारी
अन्न शोधण्या रोज जाती
ओढ घरट्याची ही न्यारी
पंख फुटतात इवली पिल्लं
हलकेच लागले उडू
अन् उंच भरारी घेण्याचे
तयांना स्वप्न लागले पडू
दिड पंखाचे एक पिल्लू
प्रश्न पडला भारी त्याला
भरारी घेणे दूर राहिले
उडता येईल का मजला?
परि जिद्द होती मनात त्याच्या
होती उडण्याचीही तयारी
पडत होते धडपडत होते
उडू लागली हलकेच स्वारी
चिवचिवले ते आनंदाने
उडून पाहिले कितीदा तरी
हलकेच बोलले ते मनाशी
नक्कीच घेणार मीही भरारी
