ध्येय
ध्येय
करुनी मेहनत न थांबता
दूर आकाशी मी जाणार
माझ्या यशाची गाथा तिथे
मी एक दिवस नक्की लिहिणार
माहितीये नाही सहज शक्य
ध्येय मोठे आभाळागत मिळवणे
मी मात्र नाही थांबणार
एक- एक पाऊल जुळवणे
येतील लाख संकटे लढताना
मी मात्र आता नाही थांबणार
मिळवण्या पासून माझे ध्येय
थांबवणे कोणालाही नाही जमणार
जेव्हा जेव्हा डगमगले माझे पाय
मी त्या सूर्याकडे पाहतो
तो कसा अविरत पणे सदोदित
स्वतःचे निःस्वार्थ काम करत राहतो
मी देखील आता करणार
त्या सूर्या सम निःस्वार्थ कष्ट
मिळवणे माझे ध्येय हेची ध्येय
भले वागो नियती कितीही दृष्ट
जाऊन त्या दूर आकाशी
मी चमकावणार आई बाबांचे नाव
झालो कितीही मोठा तरी
नाही विसरणार माती अन् गाव
