धुलीवंदन
धुलीवंदन
गोपीला पडले पहाटे स्वप्न
स्वप्नात दिसला कान्हा
उभी होती यमुनातिरी
कटीवरती होती घागर
मनात तिच्या अथांग निळा सागर
घेतला तिचा हातात नाजूक हात
कानी गोड कुजबुज
चल रंग खेळायला सखे हवी तुझी साथ
गालावर चढली लाल लाली
ओठांवरती खुदकन गुलाबी हसू
धुंद मनाने सख्यांना म्हणाली
चला कान्हाला रंग फासू
नको नको म्हणता म्हणता
लटका राग मुखकमलावर
लाजेनेही रंग झाला गोरामोरा
ठसक्यात म्हणाली नको रे
रंगाने भिजवू चहाटळ पोरा
काळ्याभोर बटांना सावरण्या राधा गोपी झाल्या दंग
उधळू गुलाल नव्याने
दरवर्षी प्रेमाने खेळू होळीचा रंग
