STORYMIRROR

Pradip Kasurde

Others

3  

Pradip Kasurde

Others

धुके भयाचे

धुके भयाचे

1 min
381

संपले सारे किनारे 

नाही कुठे विसावा 

मी चाललो अनंत 

चंद्र कोठे न दिसावा ॥1॥

ज्यानी दिला भरवसा 

झालेत तेच फरार

मी बोलण्यात फसलो

मोडला त्यांनी करार ॥2॥

दाटले धुके भयाचे 

दूर क्षितिजाचा दिवा 

ओळखीचे दूर गेले 

कळा या लागल्या जीवा ॥3॥

मोडून पडलो तरी 

लढण्याचा इरादा 

जात नाही अजुनीही 

घ्या पुन्हा येण्याचा वादा ॥4॥


Rate this content
Log in