धरा माझी..
धरा माझी..
मरनोगत होवू नको , प्रिय
अंगी महत्ताची आस
सृजन बनण्याचा नादात
चढाओढ करीत कास
कांक्षापूर्ती गुणांची धरोवर
उंच शिखरावरची पैज
घाला घालत एकमेंकात
नासवूनं करीत मौज
झगडते ! न माझ्या मनाशी
न्याय मिळण्याचा आशेनी
ओसरलेल्या सृष्टीच्या पाशेत
सोडली मेहनत हातानी
निसर्ग ! तू होतोस अवमानीत
मानवी अधर्मी कृत्यात
गहाळ करीत धन
स्वार्थ साधवत नित्यात
जबाबदार कोण ? माझ्या धराची
झाली अवस्था निंदोळ
असावी पराकाष्ठेशी नाती
भरावी स्नेहाची ओंजळ
औदार्य तु, भरवतेस सतत
गोजांरुन मायेचा हात
जीवलगा तुझे सर्वजण
का ? करती पात घात...
