धरा का रडते आहे
धरा का रडते आहे
1 min
339
पावसाने भिजलीय
चिखलात रूतलीय
वृक्षवेली चिडीचूप
पावसात नाहलीय....
वावटळं आली खूप
वृक्ष ते कोलमडले
जंगलात अस्ताव्यस्त
सारीकडे पहुडले.....
धरा का रडते आहे?
समजले हो कारक
पावसाचा अतिरेक
होतो धराला मारक.....
