धन दौलत...!
धन दौलत...!
धन दौलत....!
वयाच्या साठी नंतर
परत मागे वळून
पहावं लागत....
बायको साठी
गपगुमान रद्दीत
डोकं घालावं लागत....
चीट्या चपाट्या
निवडत निवडत
सुख शोधावं लागत....
तेंव्हा कोठे इतिहासाच्या
डोळे फोडीत
थोडंक्यात भागत...
स्वच्छता हक्क
तिचा तिला
द्यावाच लागतो....
इतिहास पुसून
नवा इतिहास
घडवावा लागतो....
घरच्या सौ ला
शांत करण्या साठी
रद्दीच गटलं उपयोगी पडत...
नको नको ते
जीवनी सार
या संसारात घडतं....
जेंव्हा सोस जीवनाचा
पुरता बदला घेतो
तेंव्हा कोठे सुखी संसार होतो
जेंव्हा इतिहासाची सावली
उपयोगी पडते
तेंव्हा एक पाऊल पुढे पडते
सौख्य समाधान शांतीची
मुहूर्त मेढ दारी सजते
तेंव्हाच धन दौलत
पैसा अडका मान मरातब घरी येते.....!
