धमक
धमक
1 min
176
वय अवघे नुकतेच सतरा झाले
त्याच वर्षी बोहल्यावर चढले......
शाळा संपून काॅलेज सुरू होते
वैभव मला चोरून पाहत होते....
लग्न झाले सासर माहेर जोडले
सासरच्या अंगणात मन रमले....
फक्त काम आणि कामच करणे
नाहीतर सासूबाईंची बोलणे खाणे...
वय होते लहान काही बोलत नव्हते
कोणी काही बोलो सदा सहन करते...
काॅलेजमधे मुली बोलायच्या सासरचे
मी मात्र सदा गप्प सर्व माझ्या माहेरचे...
मुलं सदा चिडवायची वैभववरून
मला सुख मिळायचे चिडवतात म्हणून....
पण उलटे बोलायची मात्र धमक नाही
कोणी काही बोलला तरी त्याचे नाही काही....
अशी ही वसुधा झाली पन्नाशीची तरी
उलट उत्तरे देत नाही झाला त्रास जरी..
