धारा
धारा
1 min
309
धारा धारा
अमृत धारा
राना राना
फुटला पान्हा
कोंब कोंब
हिरव्या पाना
वारा वारा
चोर वारा
मनामध्ये
मोर पिसारा
दिंडी दिंडी
टाळ टाळ
गळ्यातील
तुळस माळ
गन्ध गन्ध
तो सुगन्ध
माती मध्ये
ऋणानुबंध
कणा कणात
भिजे मनात
सृष्टी सजली
क्षणा क्षणात
धारा धारा
उष्ण वारा
सजलेला
शुक्र तारा
थेंब थेंब
जलबिंब
सृष्टी झाली
चिंब चिंब
धारा धारा
अमृत धारा
तृप्त झाली
नवं धरा
