धागा.
धागा.
1 min
206
धागा जपु नात्यांचा
कठिण वेळ आहे
सांग आयुष्या तुझा?
हा कसा खेळ आहे
जगतो असा कसा मी?
जागवित स्वप्नांना!
लावित आठवणिंचा
त्या ताळमेळ आहे
मायेची सावली ती
आता कुठे मिळेना?
आता कुठे भेटीची
ती कातरवेळ आहे?
राहणे तरी आशेवर
कसे सोडु आता!
उगवेल सुर्य पुन्हा
आज सांजवेळ आहे.
