STORYMIRROR

pooja thube

Others

3  

pooja thube

Others

धाडसी मावळे

धाडसी मावळे

1 min
475

शौर्याने स्फुरल्या बाहू

रगारगात सळसळले रक्त

जेव्हा आमच्या राजाने 

हाक दिली फक्त 


निधड्या छातीचे आम्ही

दऱ्याखोऱ्यांचे रहिवासी

आमच्या नसानसांत शूरपणा

आहोत आम्ही धाडसी 


भवानी मातेचा आहे आशीर्वाद 

हजारोंची फौज लावू उधळून

जरी तुटला श्वास नि

हात पायही गेले निखळून 


हात आईचा फिरतो 

पाठीवरून जेव्हा 

कारभारणीच्या डोळ्यात

अश्रू उभे राहतात तेव्हा 


सोडत नाहीत 

पोरंबाळं हात 

पण शत्रूला 

द्यायची असते मात


दाखवून शौर्य रणांगणावर 

खेळतो रक्ताची होळी

फत्ते करुनि मोहीम 

परततो घरी


शाबासकीचा हात माझ्या राजाचा 

देऊन जातो उभारी

धन्याची चाकरी माझ्या 

साऱ्या जगतात भारी


धाडसाचे धडे गिरवले 

लहानपणापासून आम्ही

शौर्य रुजते इथल्या मातीत

कशाची नाही कमी  


Rate this content
Log in