दहाचा पाढा
दहाचा पाढा
1 min
23.9K
दहा एक दहा दाही दुणे वीस
आवडते मला मोराचे पीस।।
दाही त्रिक तीस दाही चोक चाळीस
हसवले मी रडत्या बाळीस।।
दाही पाचे पन्नास दाही सखे साठ
झाले पहा मला पाढे पाठ।।
दाही सत सत्तर दाही आठ ऐंशी
आठ दशक आठ अठ्ठयाऐंशी।।
दाही नव नव्वद दाहो दाहो शंभर
आकाश म्हणजे नभ आणि अंबर।।
