STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Others

2  

ANJALI Bhalshankar

Others

दगडांच्या देवळात......

दगडांच्या देवळात......

1 min
188

दगडांच्या देवळांत अंध भक्तांची गर्दी सोन्या मोत्याची आरास ऊंची भरजरी वस्रांची रास

दुसरीकडे माणसांच्या जगात अंग झाकायला फाटक्या चिंधीची आस


दगडांच्या देवळात पंचपकवावन्नाची रेलचेल दगडांच्या पुतळयापुढे पंचामृताचा यज्ञ दुधातुपाचा अभिषेक. नैवेदयाचे ऊंची भोग माणसांच्या जगात ऊपासमार पोटासाठी मारामार भूकेचा आगडोंब ओशाळलेल लाचार जगणं टिचभर भुकेल्या आभाळभर आगीसाठी ऊभा जन्म मरमर करणं.


दगडांच्या देवळांत सारे गुन्हे माफ.मुकती मिळते धुवून जातात सारे पाप नोटांचा वर्षाव करावयाचा अवकाश.भलेभले कुकर्मी होतात सत्पुरुष खोट्या प्रतिष्टेचेच काय दवळातलया दगडाचेंही धनी.माणसांच्या जगात खरेपणा हारतो क्षीण होतो सत्तेच्या ताकतीपुढे कुचकामी ठरतो.हतबल होऊन जिवंत पणीच मूर्त होतो.


 दगडांच्या देवळांत भीती वसते अमानवीय धर्माच्या नावावर खपविले जातात अघोरी अधर्म.केले जातात मानसांचे बटवारे जातींची लेबल लावून रचल्या जातात रक्ताचपाताच्या हलकट गाथा दगडांच्या देवळातच.माणसांच्या जगाला प्रेमाची आस मानुसकीची साद.अन्न वस्र निवारयाची चिंता. 

दगडांच्या देवळांत सारे अपराधाची कबुली. त्याबदलयात भरभककम वसुलीची कमाई. पापांचे घडे म्हणे रिकामे होतात नवे गुन्हे करायला नव्याने सज्ज होतात.क्रूर पणाची,खोटे ढोंगी पणाची सीमा पार करतात.आभाळाकडे बोट दाखवुन कर्ता करविता तो आहे म्हणतात


Rate this content
Log in