दगड
दगड
1 min
265
कधी तो गोल तर कधी चौरस चापट
वेगवेगळ्या आकाराची विकाराची दगडं
कधी तो नाल्यातला तर कधी डोंगरावरचा
स्वतःचा आकार नसलेली ओबडधोबड दगड
निर्विकार निराकार दगड
ना त्याला स्वतःची चिंता ना दुसऱ्याची
जिथं पडला तिथल्याच रंगात मिसळणारा
लाल पांढरा काळा दगड
लहान मोठ्या आकाराची
वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण दगड
कुणाला मिळतं देव्हार्याच वैभव तर
कुणी त्यांच देव्हार्याची पायरी
त्यातच आपलं वैभव शोधणारी दगड
प्रत्येक दगडाची आपली स्वतःची वस्ती असते
आपलं काळीज असतं
आणि त्या वस्तीतच राहतात दगडी काळजाची दगडी माणसं
