देवीचे घट
देवीचे घट
1 min
413
घटस्थापना घटाची
नवदुर्गा स्थापनाची
नवरात्र उत्सवाची
लगबग प्रारंभाची
शेण सारवण करू
काळी माती अंथरवू
चला नव धान्य पेरू
घट त्यावर सजवू
नवग्रह स्थापनेची
वरूणाच्या कळसाची
तेजोमय या देवीची
आतुरता दर्शनाची
आज शैलपुत्री शक्ती
प्रतीरूप हिच सती
हिच आहे शिवशक्ती
येवू दे फळास भक्ती
माळा झेडूंच्या फुलांची
घाला तिळाच्या फुलांची
तेज अखंड दिपाची
करु आरती देवीची
विडा चढवा देवीला
घालू रांगोळी पाटाला
वंदू देवीच्या तेजाला
आले चैतन्य घराला
