देवीचा नवस
देवीचा नवस
1 min
237
केला नवस हो देवीला
यायला मुलगा हो जन्माला
कापीन बकरा तुला नैवेद्याला
साकडं घातलं ओ देवीला
नऊ मास ते भरले
गोंडस बाळ ते जन्मले
नवसाला पावली माझ्याले
घातले दंडवत देवीले
कापला बकरा देवीसाठी
मुक्या जनावरांचा बळी देती
हळहळला जीव त्याच्यासाठी
परी कोणीच न येती पुढती
त्या भोळ्या विश्वासापोटी
बळी जातात कित्येक प्राणी
करावा प्रतिकार या सगळ्यासाठी
शिक्षणाची पेटवावी एक पणती
चला होऊया सज्ज साऱ्यांनी
थांबवू हे घोर प्रकार
सुशिक्षित आहोत आपण
अंधश्रद्धा पाठवूया पार
