देवघर
देवघर
1 min
188
देवासाठी गावामध्ये
असे मंदिर सुंदर
तसे आपल्या घरात
असो एक देवघर ।।१।।
तिथे खूपशा मूर्तींची
गर्दी कधीच नसावी
पांच देवांची प्रतिमा
देव घरात असावी ।।२।।
धूप, दीप, तेल, वात
भाव निर्मितीच्या साठी
तेथे जाताच तुटाव्या
साऱ्या नैराश्याच्या गाठी ।।३।।
नीट नेटके सुबक
स्वच्छ सुंदर असावे
तिथे पूजेस बसता
चित्त प्रसन्न बनावे ।।४।।
सांज सकाळी नेमाने
तिथे प्रार्थना घडावी
होता घंटा, शंखनाद
चिंता सकल मिटावी ।।५।।
गंध फुलांच्या अक्षता
श्रद्धायुक्त ती भावना
प्रभू भेटीची केवळ
मनी असावी कामना ।।६।।
