देवभूमि रत्नागिरी
देवभूमि रत्नागिरी
लोकमान्य टिळकांची जन्मभूमी
स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी
बौद्ध धर्माच्या प्रचार अन् प्रसाराची भूमी
आंबेडकर , कर्वेंसारख्या भारतरत्नांची भूमी
युरोपियन प्रवाशांनी या जागेला भेट दिली
ब्रम्हदेशाच्या थिबा राजाला इथे कैद झाली
विजापूरकरांनी सागरी दुर्गाची निर्मिती केली
अरबी समुद्राच्या खाडयांनी किनारपट्टी सजवली
भगवती देवी ही डोंगरावर विसावली
राजापूरमध्ये पवित्र गंगा माई अवतरली
नारळी - पोफळीच्या बागा , हिरवीगार दाट वनश्री
काजू , फणस आणि हापूस आंब्याची उत्पत्ति
ऐतिहासिक महत्वाची पुण्य - पावन नगरी
अशी ही देवभूमि , कोकणातील रत्नागिरी
