देवाची आभाळमाया
देवाची आभाळमाया
1 min
315
देवा तू निर्मिले
अवघे ब्रम्हांड
पृथ्वी सूर्य चंद्र
आभाळमाया (1)
सुंदर आकाशी
चांदण्यांच्या राशी
तारे स्वयंप्रकाशी
आभाळमाया (2)
वृक्ष तरु लता
वेली बहरता
फळे फुले येता
आभाळमाया (3)
सागर सरिता
मीलन घडता
कर्ता करविता
आभाळमाया (4)
ग्रह नक्षत्रांचे
देणे सामर्थ्याचे
प्रेमळ प्रभूचे
आभाळमाया (5)
निळ्या नभांगणी
चंद्र तारांगणी
नक्षत्र रोहिणी
आभाळमाया