देवा तुझी रुपे किती
देवा तुझी रुपे किती
1 min
12K
देवा तुझी रुपे किती अफाट अनंत
होई पदोपदी थेट भेट जीवनात
देव बनूनी देव्हारी तू राऊळी मंदिरात
पालखीत मंडपात भजन कीर्तनात
माय बनूनी देवा धरीले पोटाशी
बाप बनूनी दिलास तू आसरा सतत
देवा तुझी रुपे किती....
हवालदार होऊनि उभा रक्षक चौकात
डॉक्टर बनूनी देशी जीवदान अकस्मात
होशी कधी पायलट वैनतेय आकाशात
हनुमंत वायुदूत सफर घडवि मजेत
देवा तुझी रुपे किती....
गुरु बनूनी शाळेत केले आम्हासी सज्ञान
उच्च विद्याविभूषित विद्यापीठात
खास कला अवगत संगीत पारंगत
पठ्ठा होऊनि तुझा मिरवीतो मी सभेत
देवा तुझी रुपे किती....
पारखसी गुणदोष तूच आमचा रे बॉस
