देवा अंत नको पाहू..
देवा अंत नको पाहू..
काट्यावरच्या वळणावर चालताना
मेहनती अगतिक होऊनी जातो
तु बघतोस सगळे त्याच्या कष्टाचे हाल नको होऊ देऊ....
स्वतःच्या पोटासाठी ती वेश्या
दुसर्याकडे शरीर आपलं जाळते
तुला सगळे दिसत असताना
तिला चारित्र्याची परिक्षा नको द्यायला लावू....
पोरके असलेल्या लेकरांना
तु नेहमीच रस्ता ओलांडताना पाहतोस
त्यांचा रस्ता तुझ्या हातात असताना
त्यांना चुकीचा मार्ग चुकून नको दाखवत जाऊ...
ध्येयासाठी लढणाऱ्या प्रत्येकाची
कठीण परिक्षा तु पाहतोस
त्याचा जीव आटे पर्यंत
त्याला त्यापासून वंचित नको ठेवू........
तुझ्याकडे फक्त मागणे चुकीचेच आहे
पण ज्यांनी मनापासून काही मागितले
त्यांचा अंतकाळ नको पाहू........
ज्यांना दिला तु सोन्याचा चमचा
त्यां काहिंणा दिला तर थोडी वागायची अक्कल दे
उगीच त्याचा फायदा घेऊन
बाकीच्यांकडून नको होऊ देवू चांगुलपणाचा ठेचा......
तु प्रत्येककाची वेळ येते म्हणतोस
मग का स्वतःच्याच मनाला फसवितोस
का काहींना नाही तर काहींना आजन्म दुःखी ठेवतोस...
शेवटी एकच सांगते तुला
देव आहेस तर देवासारखाच न्याय दे
तु करत नाहीस दुजा भाव
हे नेहमीच दिसु दे.......
