देव विठूराया
देव विठूराया
1 min
201
देव विठूराया / भक्त तुझ्यासाठी
पालख्या वाहती / भेटीलागी
डोई तुळशीस / हाती जपमाळ
नादमयी टाळ / भक्तीरंग
रिंगण आनंद / काय तो वर्णावा
विठ्ठलाचा धावा / मनोभावे
ओढ विठ्ठलाची / येती वारकरी
चंद्रभागा तीरी /भक्तीमेळा
नाही भेदभाव / असे समभाव
श्रेष्ठ भक्तीभाव / देवापायी