STORYMIRROR

Mrudula Raje

Others

2  

Mrudula Raje

Others

देव नाही मंदिरी

देव नाही मंदिरी

1 min
283

देव नाही मंदिरी, देव नाही मंदिरी।

देव शोधा, देव शोधा, मानवाच्या अंतरी॥


देवपण देऊन दगडा, का हो त्यासी पूजिता?

दीन, दु:खी, दलितांसाठी, भाव ठेवा जागता।

सुदाम्याचे पोहे सेवी, द्वारकापती श्रीहरी।

देव शोधा, देव शोधा, मानवाच्या अंतरी॥


रुद्राक्षांच्या लेऊन माळा, भगवी वसने नेसला।

वैराग्याचा, विरक्तीचा, ध्यास का हो घेतला?

संसाराची गोडी चाखण्या, राम ये भूमीवरी।

देव शोधा, देव शोधा, मानवाच्या अंतरी॥


लाभेल का मुक्ती तुम्हां, यज्ञात देऊन आहुती?

दया, क्षमा, शांती जिथे, भगवंत तेथे राहती।

मृगास देई जीवनदान, त्या व्याधास शिव अमर करी।

देव शोधा, देव शोधा, मानवाच्या अंतरी॥


Rate this content
Log in