STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Others

3  

SAMPADA DESHPANDE

Others

देव कलियुगाचा

देव कलियुगाचा

1 min
299

यशोदेच्या कान्हा

सावळ्या मनमोहना

तुझे गोंडस रूप

लुभविते मना ||१||

तुझ्या बाललीलांत

आजही वाटे गोडी

आई म्हणे कृष्ण बाळा

करता काही खोडी ||२||

दही हंडी तुझी

शिकवण साथ राहण्याची

एकमेका आधार देऊन

शिखर गाठण्याची ||३||

तू खरा शिष्य 

अभिमान गुरूला

बनवून जिवलग मित्र

करी मोठा सुदाम्याला ||४||

करुनि कंस वध

दाखवी जगा शक्ती

बंधू बालरामावर तुझी

मनःपूर्वक भक्ती||५||

करुनि सारथ्य अर्जुनाचे

देई त्याला ज्ञान

काम नसे काही छोटे

बाळगा अभिमान ||६||

तुझी भगवद्गीता

बनली ग्रंथमाता

तंव वाणीने पवित्र

धन्य केले पार्था||७||

तू आदर्श राजा

तू राजकारणी , तू धोरणी

आजच्या काळातही

कृष्णा लागू तुझी वाणी ||८||

तुझ्यासम नसे कोणी कृष्णा

तू वाटसी जवळचा

आजही तुझी तत्वे लागू

तू देव कलियुगाचा ||९||


Rate this content
Log in