STORYMIRROR

pranav kode

Others

3  

pranav kode

Others

देव कधी दिसला नाय...

देव कधी दिसला नाय...

1 min
327

माय माझी दिसभर

राबराब राबता

दिसभराची मेहनत बाची

चुलीवर गरम करता

चटके लागतत घाम येता

कुणाक काय बोलत नाय

दम लागता पाठ दुखता

तरी बि ती थांबत नाय

आमचा पोट भरान मग

उरला सुरला स्वतः जेवता

तिच्या आवडीचा म्हणता नुसती

सगळा तिच्याच चवीचा असता

नसली घरात एक दिस

तरी घर खाऊक उठता

देव कधी दिसलो नाय

तिच्यातच माझी माऊली दिस


Rate this content
Log in