देऊळ बंद
देऊळ बंद
1 min
37
जेव्हा जेव्हा संकट येई धावे तू सगळयांच्या हाकेला
प्रत्येक वार आहे तुच्या नावावर लिहिलेला
भली मोठी रांगा असे बाहेर देऊळाच्या
हार फुलांनी आणि फळ्यांनी सजून जाई मंडप तुझ्या भेटीला
पूजा आरत्यांनी दरवळून जाई सारा परिसर
तुचे भक्त मनाचे सांगणे तुच्या कानी सांगत
तुचे सोज्वळ रूप पाहून मन प्रसन्न करत
उत्सव जत्रांनी सजे भक्तिमय वातावरण
दिंडी पताका नाटकांना येई उधाण
असेच दिवस होते देवा पण घडले विपरीत
एका विषाणूच्या पायी झाले तुचे देऊळच बंद