देशहित
देशहित
1 min
137
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
किती थोर ते झटले
सगळ्याचा करुनी त्याग
संपूर्ण आयुष्य वेचले
मुलाबाळांचे हित न जपता
देशहित हे जपले
सर्व धर्म, सर्व पंथ
सर्वच जण लढले
त्यांच्या बलिदानामुळेच
मिळाली देशाला मुक्ती
आता करावयाचे प्रयत्न
होवो देशाची उत्तम प्रगती
नकोत भांडण नकोत कलह
एकजूट ही हवी
देशाला प्रगतीपथावर नेणारी
घडावी पिढी नवी
