STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

देहभान

देहभान

1 min
225

आईबाबांची लेक अती लाडाची

बोहल्यावर लहान वयात चढली 

वैभव बरोबर गेली छत्तीस वर्ष

सुखी संसारात रममाण होवून गेली....


लग्नाला झाली दोन वर्ष नुकतेच

संसारवेलीवर जुळ्या मुलींचा जन्म जाहला

वैभवच्या आजारपणाने डोके वर काढले

सुखी संसारात मीठाचा खडा पडू लागला....


काही दिवसात झाले सर्व ठीकठाक

 काही दिवसांनी वैभवला पुन्हा आजाराने घेरले

मग डाॅक्टरांचे इलाज झाले सुरू 

आजारी अजूनही वैभव मुलींमधे रमले...


काही वर्षांनी संसारवेलीवर दुसरे फूल आले

माझ्या आदित्य नामक मुलाचा जन्म झाला

कुटुंबात सर्वांनाच खूप आनंद झाला

तो ही सर्वांसमवेत छान वाढू लागला...


परत जीवनात वादळ आले आजाराचेच

वैभवला ब्रेनच्या आजाराने वेढले

आता मात्र हद झाली या आजारांची

मी मात्र हतबल होवून खालीच बसले...


मुंबईसारख्या मोठ्या शहरात घेतले हो उपचार

देहभान ,खाणेपिणे सारे मी विसरले 

फक्त आणि फक्त माझा वैभव बरा कसा होणार?

या कडे लक्ष देवून डाॅक्टरांचे उपचार चालू केले...


हूश्शशश झाले मोठी शस्त्रक्रिया झाली

आता मात्र सारे आहे सुरळीत सर्व चालले

संसाराला होतील छत्तीस वर्ष पूर्ण आता

संसाराला मी पूर्ण वाहून हो घेतले.,,.


Rate this content
Log in