दे ओ जरासा
दे ओ जरासा
1 min
389
इवल्याशा सुगंधी फुला रे
येरे मित्र होऊ
दे ओ जरासा
दीनांचे गीत गाऊ........१
दिगंतात परिमळ तुझाच सारा
परि हरकू नको भाऊ
आसवे अजून बाकी
चल तयांना कवेत घेऊ.......२
वसा घेऊ चंदनाचा
सुगंधी झुळूक होऊ
हरेकास सुखवून जाऊ
सृष्टीलाच न्हाऊ........३
मोल मंदारात जरी तुझे रे
मला रिते नको धाडू
दे ओ जरासा
दुःखं दूर सारू.....४
