दे हाता
दे हाता
1 min
245
काहीच न सांगता
काहीच न शिकवता
सोडलेस तू मला भवसागरी
या भवसागरी .....!
खातो गटांगळ्या
घेतो आगळ्या वेगळ्या
अनुभूति मी या भवसागरी
भवसागरी .....!
तूच तार मज कर पार
होते दमछाक फार
तरता तरता हात मारता
भवसागरी
या भवसागरी.....!
हरलो हरलो देवा
अगतिक जाहलो
थकलो रे पुरता मी
भवसागरी.....
या भवसागरी.....!
