दे अर्धी भाकर सुखाची
दे अर्धी भाकर सुखाची
1 min
158
दे अर्धी भाकर सुखाची ,
स्वाभिमान अन् कष्टाची,
निढळीच्या घामाची,
मेहनत अन् कष्टाची,
दे अर्धी भाकर सुखाची.....
माणुसकीच्या सुखाची,
सहानुभूती प्रेमाची,
न्यायनितीच्या निर्माल्याची,
दे अर्धी भाकर सुखाची.....
शांती आणि समाधानाची,
स्वकष्टाच्या अन्नाची,
जाणिवेची अन् हिंमतीची,
दे अर्धी भाकर सुखाची.....
