ड्युटी...!
ड्युटी...!
 अशी ही ड्युटी मलाही करावी लागते घरात ठेवण्यासाठी मला बाहेर यावे लागते... संयम पाळा संयम पाळा सांगितले तरी तुम्हाला घरात बसता येत नाही... कारण नसताना काय चाललंय हे पहिल्याशिवाय तुम्हाला करमत नाही... पेट्रोल बंद करूनसुद्धा तुमचा पाय अजूनही घरात ठरत नाही. सांगितलेले तुम्हाला ऐकवत नाही.. म्हणून मलाच बीळ सोडून असे दबा धरून बसावे लागते तुमच्यासाठीच तुम्हाला कोंडावे लागते... आता तरी थोडे जागरूक व्हा. माझाही नाद सोडून जरा घरीच गप्प बसा.... कोरोनाही असाच फडा काढून बाहेर बसलाय. त्याने तुमचाच घास घ्यायचा वसा घेतलाय.... तांदळातल्या खड्यासारखा त्याला बाहेच्या बाहेरच नष्ट करायचा आहे आणि आरोग्य संपन्नतेचा मोकळा श्वास घ्यायचा आहे....! स्वस्थ मस्त घरच्या घरी संयमाने सुखात रहा. कोरोनाला नष्ट झालेले उघड्या डोळ्यांनी आंनदाने पहा....!
