डॉक्टर्स डे
डॉक्टर्स डे
सगळे जण घरात बसतात
पण त्यांना कधीच सुट्टी नसते
जीवाला जीव देनाऱ्या डॉक्टरची
मात्र कमाल असते।
सगळे बाजूला ठेऊन ड्युटी बजावत असतात।
कोरोनाच्या काळात लेकरू म्हणे
बाबा असे का वागतात।
बोलत नाही आल्यावर लांबुनच सरक सरक करतात।
चुकले का आई माझे काही बाबा असे का वागतात।
नाही रे बाळा कोरोनाची भीती
त्यांनादेखील असते।
घरी आल्यावर त्यांना तुमचीच काळजी वाटते।
पेशंटचा असतो त्यांच्यावर विश्वास।
काळजी नका करू मी आहे या वाक्यावर चालतो त्यांचा श्वास।
हॉस्पिटल म्हणजे पेशंटसाठी असते मंदिर आणि डॉक्टर असतो देवमाणूस।
विश्वास त्यांचा जिंकण्या तयार असतो 24 तास
सगळी दारे बंद असली तरी
पेशंटसाठी एक दार उघडे असते
हमखास।
नाही विचारणार परत आई तुला
चुकले का माझे काही।
बाबाला माझ्या देवमाणूस समजणाऱ्या जनतेच्या त्रिवार वंदन पायी
