STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

डॉक्टर - माणसातील देव

डॉक्टर - माणसातील देव

1 min
567

देव्हाऱ्यातल्या देवाहूनही 

श्रेष्ठ असे माणसातील देव 

डॉक्टर तयाचे नाम असती

देतो आयुष्याची आम्हा ठेव


रोगग्रस्त आजारी रुग्णांवर

करतो अहोरात्र तो उपचार 

सेवाधर्म नित्य बाळगूनीच

असतो इस्पितळात संचार 


असते अथक परिश्रम त्याचे

शस्त्रक्रिया करतो तो दिनरात

आईच्या मायेने जपतो आम्हा

बोलवताच येतो त्वरित घरात


देतो ज्ञानाचा योग्य मोबदला 

करतो दिनरात रुग्णांची सेवा 

स्मितवदने पळवितो आजार 

देऊया आपण त्यालाही मेवा


माणसातील अशा या देवाचा

करूया आपण सारेच सन्मान 

सहकार्य करू त्यांच्या कार्यास

वाढवूया डॉक्टरांचा जगी मान


Rate this content
Log in