STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

डोंबारी

डोंबारी

1 min
342

नशिबी गरिबी आमच्या

नाही अजून मनात

खेळ डोंबाऱ्याचा करतो

जीव आमचा कष्टात


कष्ट करू खळगी भरू

नाही कधी हात पसरणार

जिद्द आमची मनापासून

सुखाचा सूर्य जरूर असणार


असणार दुःखी पायवाट

रस्ता हा आमचा खडतर

जिंकून घेऊ सारे आभाळ

नाही म्हणणार जीवास मर


मर हा शब्द नाही

आजवर शब्दकोशात

रिते जरी जिने आमचे

जगू जीवन जोशात


होशात करतो खेळ

तोल सारा सावरून

चिकाटी ही लढण्याची

धरते दोरीला आवरून


आवरून सांजेला पसारा

भाकर तुकडा गिळतो

दिवसभराचा शिन सारा

रस्त्यावर अंग टाकून काढतो


काढतो थकवा सारा

नव्या उमेदीने सुरवात

आभाळ छप्पर आमचे

करू कष्ट जोवर जीव हयात


धरतो हाथी हाथ

साथ ना सोडणार

परी चेहरा आमचा

सदा हसरा असणार


Rate this content
Log in