STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

डिजिटल युग

डिजिटल युग

1 min
164

निवडणुका झाल्या

महाराष्ट्राच्या नागरिकांनी

मतदानाचा हक्क बजावला

निवडून दिले प्रतिनिधींना


इतिहासात पुढे शिकवल्या जाईल

मित्र शत्रूपक्षांच्या नव्या खेळ्या

सत्तेसाठी जनतेलाच वेठीस धरले

राज्यपाल राजवट लावून


डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर वारेमाप

गुप्त मिटींगा ह्यांच्या झाल्या कोणत्या क्लॉऊडवरती

समीकरणे जुळवण्या नवे मित्रपक्ष गाठी

सामान्य नागरिकास न कळे काही


डिजिटल युगातल्या 

ह्या ऐतिहासिक घटना

सत्ता लालसेच्या 

व्हायरसने मद्यधुंद झालेल्या

कोरल्या गेल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासात


Rate this content
Log in