STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

ढोलताशा

ढोलताशा

1 min
194

खूप वर्षापासूनची मनी होती इच्छा

कविता करता यायला हवी आपल्याला

आताशा जरा जमायला लागले यमक

उच्च यमक म्हणजे काय?हे लागले समजायला...


पहिले काही मला जमतच नव्हते खरे

माझ्याच नजरेत माझी घोर झाली निराशा

पण नवकवी म्हणून काहीजण नरके ताशेर्‍यांचे बडवत होते हो ढोलताशे...


आता मात्र जराशा कविता लागल्या जमायला

कुठेही ढुंकून पाहायला आता वेळ नसतो

सतत मनी विचारचक्रांचे जाळे विणते

संघर्ष मात्र माझाच भावनांशी असतो....


माझा स्वभाव अती बोलका बाई 

आताशा झालाय जरासा अबोल मनी

सतत कवितांचे काहूर माजते अंतरी

कधी पोहोचवू माझ्या कविता जनी...


आनंदाचे उधाण येते ,मनपिसारा फुलतो

सुखाचे क्षण या जीवनात येतात

आजन्म करीत राहीन काव्याची सेवा

कोणाचे मन दुखवणार तर नाही न ही शंका मनात......



Rate this content
Log in