STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

ढोल, डीजे

ढोल, डीजे

1 min
143

मी काल घेतला कानोसा जेंव्हा 

कुजबुज कोपऱ्यातली कानी येत होती 

ढोल, फेटे , झांज , आणि डीजे 

ही मंडळी गुपचुप विश्रांती घेत होती 


सुस्तावलेला ढोल म्हणतं होता 

मला खुपच बडवला यार 

तितक्यात झांज म्हणाली  

आसमंती माझीच होती झंकार 


फेटे तुरा मटकावीत म्हणें 

माझाच मिजाज होता भारी 

नशा चढली होती प्रत्येकाला 

मी जेंव्हा बसलो होतो त्यांच्या शिरी 


डीजे म्हणे माझ्याच तालावर 

जो तों नागावाणी डोलत होता 

अरे शांताबाई , आला बाबूराव लाव 

असे ओरडून ओरडून सांगत होता


चौकाचौकात जे शहीद झालेत 

ते फटाके सुद्धा काहितरी बोलले 

म्हणे मिच केला सारा गाव जागा 

माझ्याविना का कुणाचे पान हालले


मध्येच कुणीतरी खोलीचे दार बंद केले 

पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहण्यात मग 

ढोल ,फेटे ,आणि डीजे 

झोपी गेले


Rate this content
Log in