ढगांची लगीनघाई
ढगांची लगीनघाई
ढगांची लगीनघाई मानवा
नभोमंडपी सुरेख चालली
नवरा होता बाई चांदोबा
चोरून पाहत होता चांदणीला..
चांदोबाला चांदणी सुंदर
नवरीबाई, सजणी मिळाली
चांदण्यांच्या चांदणं महालात
नवरी छान छान नटली...
ब्राम्हण नभी पोहोचला
लग्न तयारीला लागला
नवरीला बोलावले त्याने
समवेत आणले चांदोबाला....
नवरीसह नवरदेव आला
नभोमंडपी महाल सजला
गगनाने फोटो कैद केले
पाहुणे आले लग्नाला....
चांदणमहाली लग्न लागले
वधूने वराला हार घातला
वराने मंगळसूत्र वधूला घातले
लग्नाचा सोहळा पार पडला....
आशिर्वाद द्यायला धरणीमाता
ढगांच्या या लगीनघाईत रमली
नवरा नवरीला आशीश दिले
त्यांच्या आनंदात धरणी नहाली....
पांढराशुभ्र मस्त पोशाख दिला
चांदोबाला सैलसरच बनवला
चांदणीच्या मापात तयार केला
शितल चांदण्यांचा महालही सजला.....
