डायनॉसॉर
डायनॉसॉर
1 min
129
आज रात्री वाट चुकून
मी एका जंगलात गेलो
पोहोचल्यावर वाटलं मला
बस आता मी मेलो || 0 ||
भयानक एक डायनॉसॉर
अचानक समोर आला
सिंहासारखा वागणारा
माझा तर कोल्हा झाला
त्याला बघून मनात आलं
काय आहे हा डर्टी फेलो
पोहोचल्यावर वाटलं मला
बस आता मी मेलो || 1 ||
तेवढ्यात मला जाग आली
बघतो तर पहाट झाली
स्वप्न होतं कळलं जेव्हा
तेंव्हा खरी भिती पळाली
रंग त्याचा किळसवाणा
सडल्यासारखा येलो येलो
पोहोचल्यावर वाटलं मला
बस आता मी मेलो || 2 ||
