STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

डाव

डाव

1 min
295

राहीन पायापाशी राया माझी साथ नका सोडू 

डाव मांडला संसाराचा नका तुम्ही हो मोडू||धृ||


बिजलीवाणी तळपणारी मी साताऱ्याची मैना

केला सोळा शिणगार उडविन एकेकाची दैना

हृदय माझं बहाल तुम्हाला नकाच आता तोडू

डाव मांडला संसाराचा नका तुम्ही हो मोडू ||१||


रसरसलेली ज्वानीनं उफाड्याची ही काया

तुम्हासाठी आले इथवर दिलवर तुम्ही राया

नाही झुकले कुणाम्होरं उभी तुम्हापुढे हात जोडू 

डाव मांडला संसाराचा नका तुम्ही हो मोडू ||२||


कित्येक लांडगे चेकाळती बघा माझ्यापाठी 

जीव जडलाय राया आले मी तुमच्यासाठी आयुष्यभराची नाती जुळवू नका झटकन तोडू

डाव मांडला संसाराचा नका तुम्ही हो मोडू ||३||


Rate this content
Log in