दैवत माझे
दैवत माझे
जन्मोजन्मीचे भाग्य म्हणून लाभला सद्गुरूंचा सहवास
माता पिता आणि सद्गुरूंची सेवा करणे हाच आता ध्यास
वाटते आता एक क्षण ही न जावे वाया
समर्थांच्या सेवेसाठी झिजवावी ही काया
सद्गुरुंच्या दर्शनासाठी व्याकुळ होई मन
समर्थांच्या सेवेसाठी व्हाहीले मी जीवन
नको आता पुन्हा पुन्हा मज ही जगत उत्पत्ती
समर्थांच्या कृपेने लाभावी मज जन्म मरणातुनी मुक्ती
नामस्मरणाच्या शक्तीने करू संकटावर मात
भितोस कशाला तुज वरी असे सद्गुरूंचा हात
अंधारात ही साथ सोडून जात असे सावली
मात्र जन्मोजन्मी कायम उभी असे पाठीशी आपल्या गुरू मावली
घ्या दर्शन करा स्मरण विसरून जा जन्म मरण
कायम असुदे मुखी आपल्या सद्गुरूंचे नासमस्मरण
माता पित्याने दिलेला जन्म लावा सत्कारणं
सद्गुरू कृपेने मुक्त व्हा या चौऱ्यांशीच्या फेऱ्यातून
